आत्महत्याग्रस्त मुलांच्या पुनर्वसनासाठीच्या वस्तीगृहाचे 29 ला काटोड्यात भ्ाूमिपुजन
बुलडाणा, दि. 26 - सध्याच्या विज्ञान युगात माणुसकी हरवत चालली आहे. तर दुसरीकडे शेतकजयांच्या आत्महत्येने अनेक कुटूंब रस्त्यावर आले आहेत. या प्रकरणी प्रशासनासह समाज पुढे यायला तयार नाही. त्यामुळे काटोड्याचे नितेश थिगळे या युवकाने स्वत:च्या नऊ एकर जमीन विकून आत्महत्याग्रस्त शेतकजयांच्या मुलांना बळ देण्याचा आााळ ठेंगणे करणारा निर्णय घेतला आहे. गेल्या चार वर्षापासून नितेश थिगळे चिखलीच फटपाथवर पडलेल्या अनाथा, बेसहारा, मनोरुग्णांना मायेचा घास ारवित होता. या जीवांना घास ारविण्यासाठी अनेक हात त्याला धजावतांना दिसले. मात्र, आत्महत्याग्रस्त शेतकजयांची मुले दारोदार ाटकतांना त्याला दिसली. त्यामुळे नितेश थिगळे यांनी आपल्या काटोडा येथील आपल्या गावी सगळी संपत्ती विकटीक करुन या मुलांना घडविण्याचा निर्णय घेतला आहे. सत्यमेव जयते शिक्षण व बहुउद्देशिय संस्था समता एज्युकेशन सोसायटीद्वारा 1 ते 10 पर्यंत या मुलांना मोफत शिक्षणाबरोबर त्यांचा सगळा खर्च करण्यात येणार आहे. काटोडा येथे तीन एकर जमीनीवर या मुलांचे वस्तीगृह साकारल्या जाणार आहे. 29 डिसेंबर रोजी या प्रकल्पाचे उद्घाटन शांतीवनचे दिपक नागरगोजे यांच्याहस्ते या ाूमिपुजन होणार आहे. या प्रकल्पात या मुलांसाठी सर्व सुविधा या ठिकाणी करण्यात येणार असुन ाविष्यात हा प्रकल्प बंद पडणार नाही. यासाठी आपण आवश्यक तजविज करुन ठेवणार असल्याचे थिगळे यांनी जाहिर केले आहे. आपल्या वाढदिवशी थिगळे यांनी हा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी अद्याप कुणाकडे मदतीसाठी त्याने हात फैलावले नाही हे विशेष. मोताळ्याजवळच्या पिंपरीगवळी येथे अपघातात ज्ञानेश्वर सुरडकर सप्तनीक ठार झाले. दरम्यान त्यांचे तीन मुले निकिता, नेहा, रोशन ही तीन मुले उघड्यावर पडली. या मुलांना देखील थिगळे यांनी 33 हजाराची मदत केली असून या मुलांना देखील आपण दत्तक घेतल्याची माहिती त्यांनी दिली.