Breaking News

धरती बचाओ परिवाराचे पर्यावरण संवर्धनाचे कार्य स्तुत्य ः जिल्हाधिकारी

बुलडाणा, दि. 26 - पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज झालेली असतांना राष्ट्रीय हरित सेना तथा धरती बचाओ परिवाराचे पर्यावरण संवर्धनाचे कार्य स्तुत्य  असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.विजय झाडे यांनी केले.
सामाजिक वनिकरण व वनविभागा बुलडाणा यांच्या वतीने 16 डिसेंबर रोजी मुख्य शासकीय इमारतीत जिल्हाभरातील राष्ट्रीय हरित सेना शिक्षकांची  एक दिवशीय कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती. कार्यशाळेत धरती बचाओ परिवाराचे प्रमुख वनश्री जनाबापू मेहेत्रे यांनी जिल्हाधिकारी डॉ.झाडे  उपसंचालक श्री विश्‍वास व भारती विद्यापीठ पुणे चे प्रकल्प अधिकारी जीवन शेवाळे व स्वप्निल गिराडे यांना धरती बचाओ परिवाराच्या पर्यावरण संवर्धन  उपक्रमांची माहिती दिली व शासकीय मदतीचे आवाहन केले. तसेच परिवाराच्या वारसा वृक्ष संवर्धन व पक्षी संवर्धणाचा भाग म्हणून जिल्हाधिकारी तथा  उपसंचालकांना दुर्मिळ, आयुर्वेदीक व उपयुक्त गोरखचिंचा व छोट्या पक्षांसाठी बनविलेले पर्यावरण पुरक घरटे भेट दिले.
जिल्हाधिकारी, उपसंचालक तथा प्रकल्प अधिकार्‍यांनी पर्यावरण संवर्धनासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. कार्यक्रमास  जिल्हाभरातील राष्ट्रीय हरित सेनेचे 250 शिक्षकांची उपस्थिती होती.