अण्विक क्षेपणास्त्र अग्नी-5 चे यशस्वी चाचणी
नवी दिल्ली, दि. 26 - भारताने सोमवारी भूपृष्ठावरून भूपृष्टावर मारा करणा-या अग्नी-5 या आंतरखंडीय बॅलेस्टीक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. ओडिशाजवळीवर व्हिलर बेटावरून या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. या यशस्वी चाचणीनंतर हे क्षेपणास्त्र भारताच्या अण्विक ताफ्यात समाविष्ट करण्यात येणार आहे. मात्र आणखी काही चाचण्यानंतर स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडमध्ये हे क्षेपणास्त्र सामील होणार आहे.
सकाळी सुमारे 11 वाजता अग्नी-5 या क्षेपणास्त्राची लॉन्चर ट्रकच्या सहाय्याने याची चाचणी करण्यात आली. अण्विक शस्त्रास्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 5 हजार किलोमीटरपर्यंत आहे. यापूर्वीही अग्नी-5 च्या एप्रिल 2012, सप्टेंबर 2013 आणि जानेवारी 2015 मध्ये यशस्वी चाचण्या करण्यात आल्या होत्या. मात्र काही तांत्रिक समस्यांमुळे या क्षेपणास्त्राची पुन्हा चाचणी करण्यात आली. दोन वर्षांनंतर करण्यात आलेली ही अग्नी-5 चे चौथी आणि अंतिम चाचणी होती. भारताची सध्या अणुपुरवठादार देशांच्या यादीत प्रवेश करण्याचे प्रयत्न करत आहे. मात्र यामध्ये भारताला चीनच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे.