पिंपरी चिंचवडमध्ये कारची बाईकला धडक, दाम्पत्याचा जागीच मृत्यू
पिंपरी चिंचवड, दि. 26 - पिंपरी-चिंचवडच्या शाहूनगरमध्ये भरधाव स्विफ्टच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी पावणे आठ वाजता ही घटना घडली.
स्विफ्टने मागून धडक दिल्यानंतर दुचाकी 30 फुटापर्यंत फरफटत गेली. यात दुचाकीवरील अनिल बनकर आणि त्यांच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव असलेल्या स्विफ्टनं दुचाकीला धडक दिल्यानंतर पुढे असलेल्या कारला जोरदार धडक दिली. यामध्ये स्विफ्ट कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. तर चालकही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.