Breaking News

भाजपने सत्तेच्या भ्रमात राहू नये ः आम. कदम

सांगली, दि. 26 - सरकारपेक्षा सहकार चळवळीने राज्यात मोठे काम केले आहे. सहकार बुडवायला निघालेल्यांनी आपण कायमचे सत्तेत राहणार आहे. या भम्रात  राहू नये, अशी जोरदार टीका माजी सहकारमंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी भाजप सरकारवर केली.
मिरज तालुक्यातील नांद्रे येथे नांद्रे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा शताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सभागृह, सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन व व्यापारी संकुलाचे भूमिपूजन डॉ. कदम, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक  पाटील यांच्याहस्ते झाले. विकास वेध या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत शिवाजीराव चव्हाण यांनी केले. प्रास्ताविकात सोसायटीचे  चेअरमन मनोज पाटील यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला.
डॉ. पाटील म्हणाले, सहकाराच्या परंपरेला साजेसे काम नांद्रे सोसायटीने केले आहे. महाराष्ट्रातील सहकार बुडवून चालणार नाही. सरकारपेक्षा सहकार चळवळीने  राज्यात मोठे काम केले आहे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, महाराष्ट्रातून सहकार वजा केल्यानंतर काहीच शिल्लक राहणार नाही. नोटाबंदीचा निर्णय घेताना सरकारने जिल्हा बँकेच्या  बाबतीत दुजाभाव केला. एका विशिष्ठ विचाराची माणसं सरकारमध्ये आहेत. त्यांनी सहकार बुडविण्याचा एककलमी कारभार चालवलाय. राज्यात नोटाबंदीने  सर्वसामान्यांची अवस्था बिकट झाली आहे. पुरेशी व्यवस्था नसताना कॅशलेसचा आग्रह का धरला जातोय. हे समजत नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप  पाटील यांचेही यावेळी भाषण झाले.
यावेळी आम. सुमन पाटील, प्रभाकर संजय पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष स्नेहल पाटील, संयोगिता कोळी, प्रविण एडके, माणिक चौधरी, पृथ्वीराज पाटील,  उद्योजक भालचंद्र पाटील, डॉ. जयश्री पाटील, वसंतदादा कारखान्याचे संचालक महावीर पाटील, सोसायटीचे उपाध्यक्ष महावीर भोरे, संचालक जंबू सकळे,  बाळासाहेब पाटील, रावसाहेब ऐतवडे, अर्हदास पाचोरे, शांतीनाथ राजोबा, विनायक फाळके, मुजिब मुल्ला, नेताजी ढाले, तानाजी मदने, अरुणा महाजन, अजित  पाटील,  अण्णासाहेब कुंभार, अजित शिरगावकर, सतीश पाटील, सुमन पाटील, अमित पाटील, अरविंद लांडे, अजित पाचोरे उपस्थित होते.