Breaking News

सनबर्न फेस्टिव्हलला 62 लाखांचा दंड

पुणे, दि. 31 - पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हल आयोजकांना मोठा दणका दिला आहे. विनापरवाना डोंगराचं सपाटीकरण केल्याने, सनबर्न फेस्टिव्हलला तब्बल 62 लाखांचा दंड ठोठावला आहे. हवेली तालुक्याच्या प्रांताधिकारी ज्योती कदम यांनी ही कारवाई केली. तसंच दंडाची रक्कम तातडीने भरण्याचे आदेशही ज्योती कदम यांनी दिले आहेत.
सनबर्न फेस्टिव्हलसाठी केसनंद गावातील डोंगराचं मोठ्या प्रमाणात सपाटीकरण करण्यात आलं. मात्र यासाठी तहसीलदार किंवा जिल्हा खनिकर्म विभागाची  परवानगी आवश्यक होतं. पण आयोजकांकडून सपाटीकरणासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे प्रांताधिकरांनी आयोजकांना दणका दिला.  केसनंद परिसरात डोंगराचं सपाटीकरण, मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल झाली आहे. त्यामुळे त्याविरोधात न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे.