Breaking News

डाळींच्या दरात मोठी घट, किमती 40 टक्क्यांनी उतरल्या!


नवी मुंबई, दि. 31 - राज्यात यावर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे डाळींच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. डाळींचे उत्पादन वाढल्याने गगनाला भिडलेल्या डाळींच्या किमती चक्क 30 ते 40 टक्क्यांनी उतरल्या आहेत.
नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये डाळींची आवक वाढली आहे. लातूर, उस्मानाबाद , सोलापूर या जिल्ह्यातून डाळींची आवक वाढली आहे. गेल्या वर्षी डाळींच्या  किंमती 120 पासून 200 रुपयांवर जावून पोहोचल्या होत्या. मात्र यंदाच्या चांगल्या पावसामुळे डाळींचे उत्पादन वाढल्याने, या किॅमती 40 रूपयापासून 100  रुपयांपर्यंत खाली आल्या आहेत. चना डाळ सोडली तर सर्वच डाळींच्या किमती कमी झाल्या आहेत.