बडोद्यात दारु पार्टीवर छापा, आयपीएलच्या माजी अध्यक्षांसह 250 हून अधिक जण अटकेत
बडोदा, दि. 24 - गुजरातमध्ये दारुबंदी असातनाही बडोद्यातील एका फार्महाऊसवर दारु पार्टी सुरु होती. बडोदा पोलिसांनी या पार्टीवर छापा मारला. यात 250 हून अधिक जणांना अटक करण्यात आले आहे.
धक्कादायक म्हणजे अटक केलेल्यांमध्ये अनेक उद्योगपतींसह आयपीएलचे माजी अध्यक्ष चिरायू अमीन यांचाही समावेश आहे. बडोद्यातील हाय-प्रोफाईल उद्योगपतींचाही या 250 जणांमध्ये समावेश असल्याची माहिती मिळते आहे. बडोद्याजवळील सेवासी गावातील ‘अखंड’ या अलिशान फार्महाऊसवर दारुची पार्टी सुरु होती. लग्नाच्या निमित्ताने ही दारु पार्टी आयोजित केल्याची माहिती मिळते आहे.
पोलिसांना या पार्टीबाबत माहिती मिळताच छापा मारण्यात आला. अचानक छापा मारल्याने एकच गोंधळ उडाला. या छाप्यात पोलिसांनी काही महिलांनाही अटक केली आहे. छाप्यादरम्यान तेथील उद्योगपतींनी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्नही केला. फार्महाऊसवरुन पोलिसांनी 20 डबे दारु जप्त केली आहे. तर अटक केलेल्या सर्वांचे ब्लड सॅम्पल हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.