Breaking News

भारताचं अंडर 19 आशिया चषकावर नाव, श्रीलंकेचा धुव्वा

कोलंबो, दि. 24 - कर्णधार अभिषेक शर्माच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने अंडर 19 आशिया चषकावर आपलं नाव कोरलं आहे. भारताने दिलेल्या 274 धावांचा सामना करताना श्रीलंकेचा संघ 239 धावांवरच गारद झाला.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात पृथ्वी शॉने 39, हिमांशू राणाने 71, तर शुभमान गिलने 70 धावांची खेळी रचून  भारतीय डावाचा भक्कम पाया रचला. त्यामुळेच भारताला 50 षटकांत आठ बाद 273 धावांची मजल मारता आली. गोलंदाजांनीही विजयामध्ये महत्वाची भूमिका  निभावली. अभिषेक शर्माने 37 धावांत चार आणि राहुल चहारने 22 धावांत तीन विकेट्स घेऊन श्रीलंकेचा डाव 239 धावांत गुंडाळला.