Breaking News

वैद्यनाथ बँक नोटा प्रकरणातील पैसे सिग्मा हॉस्पीटलचे असल्याचा इन्कार

औरंगाबाद, दि. 27 -  वैद्यनाथ बँक नोटा प्रकरणातील दहा कोटी रुपये औरंगाबाद येथील सिग्मा हॉस्पिटलचे संचालक डॉ. उन्मेष टाकळकर यांचे असल्याच्या वृत्ताचा सिग्मा हॉस्पीटल व्यवस्थापनाने इन्कार केला आहे. याबाबत डॉ. आडवाणी म्हणाले, डॉ. टाकळकर यांनी ही रक्कम माझ्याकडे काही दिवसांपूर्वीच ठेवण्यासाठी दिली होती. 12 आणि 13 डिसेंबर रोजी काही व्यक्ती माझ्याकडे आल्या आणि ही रक्कम घेऊन गेले. त्या रकमेशी माझा काहीही संबंध नाही. याबाबत सिग्माचे डॉ. टाकळकर यांना विचारले असता ते म्हणाले, माझा आणि डॉ. सुरेश आडवाणी यांचा आर्थिक व्यवहार झालाच नाही. मी नोव्हेंबर महिन्यात बँकेत पैसे भरले आहेत. ती कागदपत्रे मी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिका-यांना दिली आहेत. ते तपास करत आहेत. माझा सीबीआयच्या तपास यंत्रणेवर पूर्ण विश्‍वास आहे.