पोलीस निरीक्षक राम जाधव ठरले आणखी एका गुन्हेगाराचा कर्दनकाळ
पुणे, दि. 30 - राष्ट्रपती पदक विजेते आणि पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेचे जिगरबाज पोलीस निरीक्षक राम जाधव हे आज पुन्हा एकदा एका गुन्हेगारी टोळीच्या म्होरक्याचा कर्दनकाळ ठरले आहेत. मावळ परिसरातील कुख्यात गुन्हेगार श्याम दाभाडे आणि त्याचा साथिदार धनंजय शिंदे या दोघांचा आज जाधव आणि त्यांच्या पोलीस टीमबरोबर झालेल्या चकमकीमध्ये मृत्यू झाला. त्यांनी आतापर्यंत 14 एन्काऊंटरच्या माध्यमातून अनेक गुन्हेगारी टोळ्यांचा बिमोड केला आहे.
राम जाधव हे पोलीस दलातील एक जिगरबाज अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नावाचा दरारा असा आहे की मोठ मोठे गुंडही त्यांच्या नावाने चळचळ कापतात. देहूरोड परिसरात प्रचंड दहशत माजविणा-या महाकाली टोळीचा म्होरक्या राकेश ढकोलिया उर्फ महाकाली याचा डिसेंबर 2011 मध्ये रावेत परिसरात पोलीस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एन्काऊंटर केला होता. त्यानंतर त्या परिसरातील गुन्हेगारी कारवायांना चाप बसण्यास मदत झाली होती.
तळेगाव दाभाडे आणि मावळ परिसरात प्रचंड दहशत माजविणार्या श्याम दाभाडे आणि त्याचा साथिदार धनंजय शिंदे या दोघांचा एन्काऊंटरही आज पोलीस निरीक्षक राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. यावेळी त्यांच्यासमवेत सहायक पोलीस निरीक्षक होडगर, पोलीस उपनिरीक्षक माने, मोरगे हे सहकारी होते. या एन्काऊंटरमुळे परिसरातील आणखी एका दहशत माजवणार्या टोळीला आळा घालण्यात पोलिसांना यश आले आहे.
राम जाधव यांनी आतापर्यंत केलेल्या 14 एन्काऊंटरच्या माध्यमातून गुन्हेगारी टाळ्यांचे जाळे उध्वस्त करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या या जिगरबाज कामगिरीमुऴे त्यांना राष्ट्रपती शौर्यपदकाने गौरविण्यात आले आहे.
त्यांच्या या कामगिरीमुळेच त्यांना गुन्हेगारी टोळ्यांचे कर्दनकाळ असे म्हंटल्यास वावगे ठरू नये.