Breaking News

किल्लारी, उमरगा, लोहारा परिसर भूकंपाने हादरला

लातूर, दि. 03 -भूकंपग्रस्त किल्लारी ता. औसा व परिसर, उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा, लोहारा तालुक्यांतील अनेक गावांना बुधवारी ता. दोन दुपारी  पावणेतीनच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसला. लातूर येथील भूकंप मापक केंद्रावर त्याची दोन रिश्टर स्केल नोंद झाली. या धक्क्यात कोणतीही जीवित  किंवा वित्तहानी झालेली नाही. ग्रामस्थांत मोठी घबराट निर्माण झाली. 
भूकंपग्रस्त भागात दिवाळी उत्साहात साजरी होते  होते तोच  हा परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. सर्व व्यवहार सुरळीत सुरू असतानाच किल्लारीसह  गुबाळ, नांदुर्गा, तळणी, कारला, सिरसल, नदीहत्तरगा आदी भागांत दुपारी 2.41 ला भूकंपाचा सौम्य धक्का बसला. लातूरच्या भूकंप मापक केंद्रापासून 41  किलोमीटरवरील किल्लारी परिसरात भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. या भागाला 17 फेब्रुवारी 2015 ला 2.4 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला होता. त्यानंतर म्हणजे  दीड वर्षानंतर आज पुन्हा भूकंपाचा धक्का बसला.