महिन्याच्या शेवटच्या सोमवारी पीएमपीएमएल मधून मोफत बस सेवा
पुणे, दि. 30 - पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना दर महिन्याच्या शेवटच्या सोमवारी पीएमपीएमएल मधून मोफत बससेवा देण्यात यावी. या स्वरूपाचा प्रस्ताव स्थायी समितसमोर ठेवण्यात आला होता.
त्यावर दीर्घकाळ चर्चा झाल्यानंतर (मंगळवार) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी दिली.
या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असली तरीही याची अंमलबजावणी मात्र सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या विषयी बोडके म्हणाले की, पीएमपीएमएलमधून महिन्याच्या शेवटच्या रविवारी नागरिकांना बस सेवा मोफत दिली जावी. असा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवण्यात आला होता, मात्र यावर दीर्घकाळ चर्चा करण्यात आल्यानंतर रविवारी ऐवजी सोमावर निश्चित करण्यात आले.
या उपक्रमामुळे नागरिक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतील आणि पर्यावरणाचा समतोल देखील राखण्यास मदत होणार आहे.
त्याच बरोबर एक दिवसाचे पीएमपीएमएल चे उत्पन्न 1 कोटी 70 लाख रुपये असून त्याची रक्कम पुणे महापालिका देणार असल्याचे त्यांनी सांगितले.