मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कारने दोन पोलिसांना उडवले, महिला चालक ताब्यात
पुणे, दि. 03 - मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लेन कटिंग आणि ओव्हर स्पीडची कारवाई करण्यासाठी व्हिडीओ रेकॉर्डिंग करणार्या दोन वाहतूक पोलिसांना महिला चालकाने उडवलं. रेखा शहा असे महिला चालकाचे नाव असून तिला लोणावळा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मळवलीजवळ ही घटना घडली. या घटनेत एका पोलिस कर्मचार्याचा पाय फ्रॅक्चर झाला असून एक जण किरकोळ जखमी झाला आहे.
मुंबईवरुन पुण्याला येताना रेखा शहा या भरधाव वेगात स्विफ्ट डिझायर कार चालवीत होत्या. यावेळी त्यांच्या गाडीचा नंबर घ्यायला पुढे आलेल्या पोलिसांना उडवले. त्यानंतर विरुद्ध दिशेला जाऊन अन्य एका कारला धडक दिली. यानंतर पोलिसांनी रेखा शाह या महिला चाल
काला ताब्यात घेतले आहे.

Post Comment