Breaking News

बंदीबाबत एनडीटीव्हीचे स्पष्टीकरण

मुंबई, दि. 04 -माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रस्तावित बंदीबाबत एनडीटीव्ही इंडियाने आपले म्हणणे मांडले आहे. सरकारच्या आदेशामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. पठाणकोट हल्ल्याबाबत प्रत्येक वृत्तवाहिनी आणि वृत्तपत्राने केलेले कव्हरेज एकसारखेच होते. त्यामुळे सरकारने एनडीटीव्हीवरच कारवाईचा बडगा उचलणे हैराण करणारे आहे, असे एनडीटीव्हीने म्हटले आहे.
पठाणकोट हवाई हल्ल्याचे अतिसंवेदनशील आणि अतिप्रमाणात कव्हरेज केल्याने एनडीटीव्ही हिंदी या वृत्तवाहिनीचे प्रक्षेपण 1 दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे 9 नोव्हेंबरला एनडीटीव्ही हिंदीचे प्रसारण बंद ठेवले जाण्याची शक्यता आहे. मीडिया क्षेत्रातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे..केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाने एनडीटीव्ही हिंदीवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
जानेवारी महिन्यात पठाणकोटच्या हवाई तळावर दहशतवादी हल्ला झाला होता. यावेळी हल्ल्याचे वार्तांकन करताना मिग आणि लढाई विमाने, रॉकेट लाँचर्स या सगळ्याचा तपशील एनडीटीव्हीवर मांडण्यात आला होता. संवदेनशील माहिती उघड केल्यानं देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचण्याची शक्यता असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. याप्रकरणी एनडीटीव्हीला कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र सर्वच माध्यमातून अशा प्रकराची माहिती दाखवल्याचे एनडीटीव्हीने म्हटले आहे.