जयंतराव तासगावात नाक खुपसू नका
सांगली, दि. 30 - माझ्यावर गुंडगिरी व दहशतीचा आरोप करणारे जयंत पाटील सांगली जिल्ह्यात गुंडगिरी करण्यासाठी माहीर आहेत. आपल्या मतदार संघात त्यांनी काय केले आहे, ते आधी पाहावे आणि मगच आरोप करावेत. जयंतराव तासगावात नाक खुपसण्याचा तुम्हांला अधिकार नाही, असा इशारा खासदार संजयकाका पाटील यांनी पालिका निवडणुकीतील विजयानंतर पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
ते म्हणाले, काँग्रेसच्या खंडणीबहाद्दरास जनतेने मतदानातून चपराक दिली असून हा जनतेचाच विजय आहे. खासदार पाटील म्हणाले, विरोधकांनी गेल्या काही दिवसांपासून भाजपवर बिनबुडाचे आरोप करण्याचा सपाटा लावला होता. मात्र जनतेला सर्व काही समजते. काँग्रेसचे खंडणीबहादर तर माझ्यावर गुंडगिरीचे अनेक खोटेनाटे आरोप करत होते. मतदानावरुन वाद झालेल्या ठिकाणी मी काय झाले, हे पाहण्यासाठी गेलो होतो. मात्र महादेव पाटील यांनी त्यांना थोबाडित मारल्याचा बोभाटा केला. त्यांच्या भानगडी आता लवकरच बाहेर काढणार आहे. मात्र तासगावच्याच जनतेने नगरपालिका मतदानातून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे.
जयंत पाटील यांनी केलेल्या आरोपाबाबत बोलताना खा. पाटील म्हणाले, जयंत पाटील जिल्ह्यात माहीर आहेत. तासगावच्या राजकारणात त्यांनी नाक खुपसू नये. यापुढे तासगावच्या विकासासाठी कोट्यावधींचा निधी आणून तासगाव शहर स्मार्ट सिटी करणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार डॉ. विजय सावंत, हणमंत पाटील उपस्थित होते.