Breaking News

कुर्‍हाडीचे वार करुन सुनेची हत्या, आरोपी सासरा पसार

सोलापूर, दि. 04 - कुर्‍हाडीचे घाव घालून सासर्‍यानेच सुनेची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोलापुरात अक्कलकोट तालुक्यातील वागदरी गावात हा प्रकार घडला आहे.
पार्वती मगी या महिलेची तिच्या सासर्‍यांनीच कुर्‍हाडीने वार करुन हत्या केली आहे. हत्येनंतर आरोपी सासरा पसार झाला असून त्याचा शोध सुरु आहे. हत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. अक्कलकोट पोलिस आणि श्‍वानपथक वागदरी गावात दाखल झाले असून खून करुन पलायन केलेल्या आरोपीचा शोध सुरु आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन हत्येसाठी वापरलेली कुर्‍हाड जप्त केली आहे.