Breaking News

आश्रमशाळेतील बलात्कारप्रकरणी आणखी 4 जणांना बेड्या

बुलडाणा, दि. 04 - बुलडाण्याच्या गणेशपूरमधल्या कोकरे आश्रमशाळेतील अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची एकूण संख्या 11 वर पोहोचली आहे.
बाळा शिवार परिसरातील कोकरे आश्रमशाळेत ही धक्कादायक घटना घडली. घटनेनंतर परिसरात प्रचंड तणाव आहे. शाळेतील कर्मचार्‍यांनीच हे कृत्य केल्याचा आरोप मुलीने केला आहे. मूळची जळगावच्या असणारी ही मुलगी दिवाळीच्या सुट्टीसाठी घरी गेली होती. तिथे पोटात दुखत असल्याची तक्रार तिने पालकांकडे केल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. याप्रकरणी सुरुवातील 7 जणांना अटक केली होती. तर गुरुवारी रात्री आणखी 4 जणांना अटक बेड्या ठोकल्या. त्यामुळे आतापर्यंत 11 जणांना अटक झाली आहे.