बेघर स्वातंत्र्य सैनिकांना घरासाठी अर्थसहाय्य योजना सुरु
सातारा दि. 30 (प्रतिनिधी) : ज्या स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या हयात पत्नीला अजूनही स्वत:चे घर नाही अशा स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या हयात पत्नीला त्यांच्या राहत्या गावात घर घेण्यासाठी 10 लाख रुपयाच्या मर्यादेत अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांनी दिली.
बेघर स्वातंत्र्य सैनिकांची संख्या निश्चित होण्यासाठी पुढील निकषांनुसार जिल्ह्यातील लाभार्थ्यांकडून तहसिलदारांच्या मार्फत अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या हयात पत्नीच्या नावे (स्त्री स्वातंत्र्य सैनिक असल्यास तिच्या नावे किंवा तिच्या हयात पतीच्या नावे) किंवा त्यांच्या निकटवर्तीयांचे नावे भारतात किंवा महाराष्ट्रात किंवा इतर देशात कोठेही स्वत:चे घर नाही. निकटवर्तीयामध्ये स्वातंत्र्य सैनिकांचा मुलगा आणि मुलगी त्याच्या नामनिर्देशनाच्या आधारे ज्या व्यक्तीस शासकीय नोकरी मिळाली आहे अशा व्यक्तीचा समावेश आहे. राज्य शासनाकडून निवृत्तीवेतन घेणारे महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिक किंवा केंद्र शासनाकडून निवृत्तीवेतन घेणारे महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिक अर्थसहाय्यासाठी अर्ज करु शकतील. स्वातंत्र्य सैनिक किंवा त्यांची पत्नी, पती यापैकी एकजण हयात असणे आवश्यक आहे. ते किंवा त्याच्या नावाने त्यांचे निकटवर्तीयांना अर्ज सादर करता येईल. स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या हयात पत्नीच्या नावे (स्त्री स्वातंत्र्य सैनिक असल्यास तिच्या नावे किंवा तिच्या हयात पतीच्या नावे) किंवा त्यांच्या निकटवर्तीयांकडे मागील 10 वर्षापासून स्वत:चे घर नाही या विषयीचा पुरावा म्हणून पुढील कागदपत्रे करणे आवश्यक राहील. (अ) स्वातंत्र्य सैनिकांच्या वडिलांचे ज्यावेळी निधन झाले त्यावेळी स्वातंत्र्य सैनिकांच्या वडीलांच्या नावे असलेल्या मिळकतीचा दाखला.
(आ) वडीलोपार्जीत मिळकतीच्या वाटण्या झाल्यांनतर स्वातंत्र्य सैनिकांच्या वाट्यास आलेल्या वडीलोपार्जीत मिळकतीचा दाखला. (इ) स्वातंत्र्य सैनिकांच्या निकटवर्तीयांच्या नावे असलेल्या मिळकतीचा दाखला. (ई) मागील 10 वर्षापासून स्वातंत्र्य सैनिक किंवा त्यांच्या हयात पत्नी भाड्याच्या घरात रहात असल्याचा पुरावा म्हणून घर मालकाबरोबर झालेल्या नोंदणीकृत करारनाम्याची साक्षांकित प्रत, स्वातंत्र्य सैनिक किंवा त्यांची हयात पत्नी यांनी किंवा त्यांच्या निकटवर्तीयाने महाराष्ट्रात कोठेही म्हाडा, सिडको यांच्या गृहनिर्माण प्रकल्प योजनेचा किंवा शासनाच्या अन्य गृह निर्माण प्रकल्प योजनेच्या किंवा घरबांधणी योजनेचा यापूर्वी लाभ घेतला असल्यास ते अर्थसहाय्य मिळण्यास अपात्र राहतील. स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा किंवा मुलीने किंवा स्वातंत्र्य सैनिकाच्या नामनिर्देशनाच्या आधारे ज्या व्यक्तीस शासकीय नोकरी मिळाली आहे अशा व्यक्तीस शासकीय निवासस्थान मिळाले आहे. ते अर्थसहाय्य मिळण्यास अपात्र रहातील. स्वातंत्र्य सैनिक किंवा त्यांची हयात पत्नी किंवा त्यांची निकटवर्तीयास यापूर्वी घरासाठी किंवा शेतजमीन देण्यात आली असल्यास ते अर्थ सहाय्य मिळण्यास अपात्र राहतील, स्वातंत्र्य सैनिकास दोन किंवा दोनपेक्षा अधिक पत्नी व स्वातंत्र्य सैनिकाचा मृत्यू झाला असल्यास त्याच्या पत्नीला केवळ एक घरासाठी अर्थसहाय्य मिळण्याकरिता अर्ज करता येईल.
वरील सर्व निकषांचे पूर्ततेसह विहित नमुन्यातील अर्ज प्रतिज्ञापत्रासह तहसीलदारांच्याकडे दि. 28 जानेवारी 2017 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी यादव यांनी केले आहे.