Breaking News

वर्षभरात पाककडून 430 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन

नवी दिल्ली, दि. 30 - गेल्या वर्षभरात पाकिस्तानकडून तब्बल 430 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली. संरक्षण राज्यमंत्री डॉ.  सुभाष भामरे यांनी ही माहिती दिली.
25 नोव्हेंबर 2015 ते 26 नोव्हेंबर 2016 पर्यंत पाकिस्तानकडून 430 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यावेळी झालेल्या चकमकीत लष्कराचे 8 जवान  मारले गेले असून 74 जवान जखमी झाले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ आणि आंतरराष्ट्रीय सीमेजवळील लष्करी छावण्यांवर 216 वेळा पाकिस्तानकडून शस्त्रसंधी  करण्यात आली. तर याच कालावधीत सीमा सुरक्षा दलाच्या छावण्यांवर 214 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. तसेच 7 नोव्हेंबर 2016 पर्यंत 111 घरांचे  नुकसान झाले.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील किंवा आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळ झालेल्या गोळीबाराच्या घटनांमुळे स्थानिकांना तेथून हलविण्यात आलेले नाही. मात्र  जम्मूमधील  27,449 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.