देशभरातील चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत लावणे बंधनकारक - सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली, दि. 30 - देशभरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावणे बंधनकारक असल्याचे आज सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
राष्ट्रगीत लावणे बंधनकारक असून त्याच्या सन्मानार्थ सर्वांनी उभे राहणे आवश्यक आहे. राष्ट्रगीत हे राष्ट्राची ओळख, राष्ट्राची एकता आणि देशभक्तीशी जोडले गेले आहे. त्याचप्रमाणे चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रध्वज दाखवणे अनिवार्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. केंद्र सरकारकडून लवकरच या संबंधीच्या आदेशांची प्रत सर्व राज्यांना पाठविली जाणार आहे. चित्रपटाआधी राष्ट्रगीत पडद्यावरून सादर केले जात असताना उभे राहावे की नाही, याची निश्चित नियमावली नसल्यामुळे चित्रपटगृहात अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवल्याचे समोर आले आहे.