Breaking News

कोलाकाता कसोटी जिंकून भारत अव्वल स्थानी

कोलकाता, दि. 03 - विराट कोहलीच्या टीम इंडियाने कानपूरपाठोपाठ कोलकात्यातही न्यूझीलंडचा धुव्वा उडवून तिरंगा फडकावला. दुसर्‍या कसोटीसह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. दुसर्‍या कसोटीत भारताने न्यूझीलंडचा 178 धावांनी धुव्वा उडवला. या विजयामुळे आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत निर्विवादरित्या अव्वल स्थानावर झेप घेतली. त्यामुळे आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत आता पाकिस्तानची दुसर्‍या स्थानावर घसरण झाली आहे.
ईडन गार्डन्सवरच्या दुसर्‍या कसोटीत भारताने न्यूझीलंडवर 178 धावांनी मात केली. या कसोटीत भारताने दुसर्‍या डावात सर्व बाद 263 धावांची मजल मारून, न्यूझीलंडला विजयासाठी 376 धावांचे आव्हान दिले होते. टॉम लॅथम आणि मार्टिन गप्टिल यांनी 55 धावांची सलामी देऊन खेळात संघर्षाचा रंग भरला. पण अश्‍विननं गप्टिलला बाद करून ही जोडी फोडली आणि ठराविक अंतराने न्यूझीलंडच्या विकेट्स पडायला लागल्या. मग अश्‍विननेच टॉम लॅथमची झुंजार खेळी संपुष्टात आणली. त्यामुळे भारताचा विजयाचा मार्ग सुकर झाला.