Breaking News

तनपुरे सहकारी साखर कारखान्यांच्या कर्मचार्‍यांना आगाऊ पगार मिळणार ः सुजय विखे


अहमदनगर, दि. 24 - यंदा राहुरी येथील डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचार्‍यांची दिवाळी गोड होणार आहे. निवडणुकीत दिलेल्या शब्दांची  थोडी फार पूर्तता म्हणून कायम स्वरूपी कर्मचार्‍यांना 7000 /- रुपये, हंगामी कायम स्वरूपी कार्मचार्‍यांना 5000/-, टेम्पररी कार्मचार्‍यांना 3000/-,  रोजंदारीवरील कार्मचार्‍यांना 1500/- रुपये या प्रमाणे एकूण 85 लाख रुपये अकाऊटला भरणार असून 25, 26, 27 तारखेला कामगारांना आगाऊ पगार वाटप  करणार असल्याचे डॉ. सुजय विखे यांनी सांगितले.
राहुरी महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच येत्या 2 दिवसात कामगार वसाहतमध्ये वीज जोडणी केली जाईल व त्यानंतर 15  दिवसात पेट्रोल पम्प सुरु करू त्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पा. यांनी उर्जा मंत्री बावनकुळी यांनी वीज बिलाच्या थकीत 1 कोटी 32 लाख रुपयांच्या रकमेचे  हफ्ते पाडून द्यावे, अशी विनंती केली होती. ती मान्य करून 14.50 लाख रुपये भरून उर्वरित रक्कम 24 हफ्त्यात भरायची आहे अशी हि माहिती त्यांनी या वेळी  दिली. त्याच प्रमाणे कामगार वसाहतीत पाणी प्रश्‍नावर तोडगा म्हणून देवळाली नगर पालिकेची थकीत पाणी पट्टी 20 लाख रुपया पैकी 5 लाख रुपये भरून पाणी  पुरवठा सुरळीत करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्य सरकारच्या नवीन स्कीम नुसार सेल्स टॅक्समध्ये 2.5 लाख रुपये भरून 71 लाख रुपये  कारखान्याचे वाचवणार आहेत. हे सर्व करत असताना कारखान्याकडे 1 रुपया शिलक्क नव्हता. हा सर्व प्रश्‍न संचालक मंडळापुढे मांडला असता विद्यमान सर्व  संचालाकांनी प्रत्येकी 2 लाख रुपये कारखान्याकडे बीन व्याजी ठेव ठेवण्याचा निर्णय एक मतांनी घेतला. त्याच प्रमाणे 2008-09 तत्कालीन संचालक मंडळावर  वसुली निघालेली आहे. येत्या महिना भरात त्याच्या  7/12 वर बोजा चडवला जाणार आहे. तसेच 2011-12, 2012-13, 2013-14 या वर्षातील संचालक  मंडलावर  2012-13 या वर्षी 22.50 कोटीची जबाबदारी आहे. या बाबत कारवाई होणे बाकी आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून राज्य सरकारला निवेदन  दिले आहे, अशी माहिती या वेळी त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.