पदरात काय पडणार?
दि. 24, ऑक्टोबर - महाराष्ट्राची नेहमीच एक खुबी राहीली आहे. या महाराष्ट्राला एक विशिष्ट चेहरा आहे. अगदी सुरूवातीपासून विचार करायचा झाला तर राजेशाहीत देखील या चेहर्याला विद्रुप करण्याचे कारस्थान यशस्वी झाले नाही. मुळातच या महाराष्ट्राच्या मातीत वैचारिक सुपिकता आहे या मातीत वैचारिक जाती धर्माच्या विषाचे बीज रूजविण्याचा अनेकांनी प्रयत्न करून पाहिला. मात्र दगडधोंड्यांच्या या देशात संत महात्मे महापुरूषांच्या विचारांची बिजे पक्की रूजली असल्यामुळे हे कुटील प्रयत्न अक्षरशः केविलवाणे ठरले.
हजारो वर्षांची परंपरा असलेली बहुजन समाजव्यवस्था परस्परांशी निर्माण झालेल्या स्नेहबंधाच्या धाग्यांनी घट्ट बांधली गेली होती आणि आहे. त्यातच राजे शिवछत्रपती, महात्मा फुले, राजेश्री शाहू महाराज, राजे सयाजीराव गायकवाड, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या युगपुरूषांनी केलेले समाजकारण आणि त्यातून राबविलेले सत्ताकारण यांचा सकारात्मक प्रभाव समाजव्यवस्थेवर पडला. तोच प्रभाव अगदी कालपरवापर्यंत कायम होता. मग आजच या समाजव्यवस्थेचे बंध ढिले का होऊ लागलेत? हजारो वर्ष एकत्र नांदणारा बहुजन समाज परस्परांच्या विरोधात दंड थोपटून लाखोंच्या संख्येने रस्त्यावर का उतरतो आहे? याचा विचार करून उत्तर शोधण्याचे मोठे आव्हान समाज अभ्यासकांच्या समोर आहे. अलिकडच्या काळात महाराष्ट्राच्या रस्त्यांवर उतरणारे लाखोंचे जथ्ये एक इव्हेंट बनलाय. कुठला झेंडा आहे. या इन्व्हेंटचा कुठला रंग चमकतो आहे. या इन्व्हेटमधून? काय हेतू आहे या इव्हेंटचा? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे इव्हेंटचे मॅनेजमेंट कोण करते आहे? वरवर रास्त वाटणार्या या इव्हेन्टच्या मागण्या खरोखर मान्य होणार आहेत का? मग कशासाठी हा अट्टाहास? मोर्चामागून मोर्चे काढण्याची स्पर्धाच या महाराष्ट्राच्या बहुजन समाजात सुरू झालेली दिसते आहे. कधी भगवा, कधी निळा, कधी पिवळा तर कधी या तिन्ही रंगाच्या मिश्रणासोबत पांढरा ध्वज फडकतो आहे. रंगून गेलाय सारा महाराष्ट्र. जातीजातीत संघर्ष पेटविण्याचे हे पाप कोण करतयं? कुणाचा हेतू साध्य होणार आहे. या इव्हेंट मधून? या प्रश्नांची उत्तरे न समाजइतका बहुजन समाज दुधखळा कधीपासून झाला? का लक्षात येत नाही मनुवाद्यांची खेळी? सत्तेसाठी सत्तेचा रिमोट कंट्रोल हातात धरून राज्यकारभार करणारे सत्तेबाहेरचे हे सत्ताकेंद्र कोण? हे समजून घेण्याची खरी गरज आहे. या खेळात सत्ताबदल होईल, सरकारे येतील जातील, माणसांची मनं मात्र कायमची दुभंगली जातील.