Breaking News

स्वराज्य क्रिडा अ‍ॅकेडमीच्या धनुर्विद्या स्पर्धेसाठी सात खेळाडूंची राज्यस्तरिय स्पर्धेसाठी निवड

अहमदनगर, दि. 24 - नेवासाफाटा  क्रिडा व युवक सेवा संचलनाय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत सोलापूर जिल्हा क्रिडा व धनूर्विद्या संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने  वरवडे ता. माढा येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये येथील स्वराज्य अ‍ॅकेडमीच्या 13 खेळाडू सहभागी झाले होते. त्या खेळाडूंपैकी सात खेळाडूंची अलिबाग - रायगड  येथे होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
त्रिमुर्ती शैक्षणिक संकुलातील घाडगे-पाटील विद्यालयाची इयत्ता नववीची 17 वर्ष वयोगटातील कु.जागृती सुधीर कुंदे हिने धनूर्विद्या स्पर्धेत इंडियन राऊंड मध्ये  प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर त्रिमुर्ती पब्लिक स्कुलची विद्यार्थीनी कु. समृद्धी चंद्रकांत वामन इयत्ता दहावीच्या विद्यार्थीनीने 17 वर्ष वयोगटामध्ये रिकर्व्ह  राऊंडमध्ये प्रथम क्रमांक, कु. लक्ष्मी नरेंद्र दारवंटे व्दितीय, ज्ञानेश्‍वर महाविद्यालयाची कु.साक्षी राजेंद्र शिताळे इयत्ता अकरावी 19 वर्ष वयोगटात रिकर्व्ह राऊंडमध्ये  प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे. तर ज्ञानेश्‍वर महाविद्यालयाचा विद्यार्थी गणेश मारोती मिसाळ इयत्ता अकरावी 19 वर्ष वयोगटामध्ये रिकर्व्ह राऊंडमध्ये  प्रथम क्रमांक पटकविला आसून ज्ञानोदय इंग्लिश स्कुल नेवासा विद्यालयाचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी अजिंक्य अनिल भगत याने इंडियन राऊंड स्पर्धेमध्ये तृत्तीय  क्रमांक मिळविला आहे.तर ज्ञानोदयचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी गौरव शांताराम मगर  17 वर्ष वयोगटामध्ये रिकर्व्ह राऊंड स्पर्धेमध्ये तृत्तीय क्रमांक मिळवून यश  संपादन केले आहे.
विजयी सात खेळाडूंची अलिबाग-रायगड येथे होणार्‍या राज्यस्तरिय स्पर्धे करीता निवड झाली आहे.
वरिल खेळाडूंना स्वराज्य क्रिडा अ‍ॅकेडमीचे मुख्यप्रशिक्षक अभिजित दळवी, शुभांगी दळवी - रोकडे यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी खेळाडूंचे विविध स्तरांतून  अभिनंदन केले जात आहे.