Breaking News

सरकार तुमचंच, मागा चार हजाराचा भाव अजित पवारांचा शेट्टींना टोला

सोलापूर, दि. 28 - सरकार तुमचं आहे, मागा चार हजार रुपये भाव, कुणी अडवलं तुम्हाला, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजू शेट्टींना टोला हाणला आहे. साखर जेव्हा चार हजार होईल, तेव्हा ऊसाला 3200 रुपयांचा भाव परवडतो, अशी चौफेर टोलेबाजी सोलापूरच्या बार्शीत अजित पवारांनी केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि बळीराजा शेतकरी संघटना आता आमने-सामने येण्याची चिन्हं आहेत. कारण कारखानदारांचे दलाल बनलेल्या राजू शेट्टींनी फक्त 3200 रुपयाचा भाव मागून शेतकर्‍यांची फसवणूक केल्याचा आरोप बळीराजा आणि शिवसेनेनं केला आहे. पहिली उचल 3500 रुपये मिळाली पाहिजे यासाठी बळीराजा संघटना आणि शिवसेना रस्त्यावर उतरणार आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून 2 नोव्हेंबरला बळीराजा शेतकरी संघटना पुण्याच्या साखर संकुलावर जागर मोर्चा काढण्याचा तर 4 नोव्हेंबरला पुणे-बंगळुरु हायवेवर रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 25 ऑक्टोबरला राजू शेट्टींनी जयसिंगपुरात ऊस परिषद घेतली होती. त्यावेळी उसाला 3200 रुपयांची पहिली उचल देण्याची मागणी त्यांनी केली होती.