Breaking News

ना नफा ना तोटा तत्वावर दिवाळीचे फराळ बेलापूर किराणा मर्चंण्ट असोसिएशन तर्फे

अहमदनगर, दि. 24 - बेलापूर दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर डाळ तूप व किराणा मालाच्या किंमती सामान्य मानसाच्या अवाक्याबाहेर गेल्याने दिवाळी गोड होईल  की नाही अशी स्थिती असताना बेलापूर किराणा मर्चंण्ट असोसिएशन या व्यापारी संघटनेने ना नफा ना तोटा तत्वावर दिवाळीचा फराळ विकण्याचा स्तुत्य उपक्रम  सुरू केल्याने सर्वसामान्यांची दिवाळी गोड होणार आहे.
बेलापूर किराणा व्यापारी संघटना गेल्या तीन वर्षापासून सदरचा उपक्रम राबवित आहे. यावर्षी कोणताही फराळ प्रतिकिलो रू. 120 प्रमाणे ना नफा ना तोटा  तत्वावर उपलब्ध केला आहे. यात होणारा तोटा व्यापारी सहन करणार आहेत. तोटा आल्यास त्याची भरपाई करण्यास आम्ही हातभार लावू असे लुक्कड यांनी  आश्‍वासन दिले. याउपक्रमाचे उदघाटन बेलापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे यांच्या हस्ते तसेच सुनिल मुथा, मारोतराव राशिनकर, देवीदास देसाई,  शरद नवले, रवी खटोड, सुधीर नवले, अ‍ॅड. मधूकर भोसले, राजेंद्र खटोड, अ‍ॅड. सुनील मुंदडा, अभिषेक खंडागळे, प्रफुल डावरे उपस्थित होते. सदर उपक्रम  यशस्वीतेसाठी किराणा व्यापारी संघटनेचेेे अध्यक्ष शांतीलाल हिरण, योगेश चामल, जूगल किशोर मुंदडा, सचिन कोठारी, संजय बाठीया यांनी प्रयत्न केले. यावेळी  राजेंद्र सिकची, प्रमोद मुथा, सुनिल लढ्ढा, गोविंद सोमाणी, राजेंद्र राठी, पुष्पाताई कोठारी, कमल, किशोर मुंदडा, हैदरभाई सय्यद, संजय बाठीया, हरिप्रसाद मंत्री  आदि व्यापार्‍यांसह महिला प्रतिनीधी उपस्थित होत्या.