अशोकचा बॉयलर अग्नीप्रदीपन सोहळा संपन्न
अहमदनगर, दि. 24 - परिवर्तन हा निसर्गाचा नियम असून तो स्विकारला पाहिजे. माणसानेही बदलत्या काळानुसार स्वतःमध्ये बदल घडविले पाहिजेत. शेतकर्यांनी उत्पादकता वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करुन त्याचा शेतीमध्ये वापर केला पाहिजे. यापुढील काळात बदल स्विकारले नाहीत ते संपतील आणि बदल स्विकारतील तेच टिकतील, असे प्रतिपादन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले.
अशोकच्या सन 2016-17 गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नीप्रदिपन समारंभाप्रसंगी मुरकुटे बोलत होते. कारखान्याचे चेअरमन कोंडीराम उंडे, व्हा. चेअरमन दत्तात्रय नाईक, ज्येष्ठ नेते के. वाय. बनकर, माणिकराव जगधने, इंद्रनाथ थोरात, हिम्मतराव धुमाळ, दिपक पटारे, अनुराधा आदिक, जि. प. सभापती शरद नवले, पं. स. सभापती वंदना राऊत, गिरीधर आसने, सिध्दार्थ मुरकुटे, एल. पी. थोरात, श्रीमती काशिबाई डावखर, सुनिता गायकवाड, भारती कांबळे, मंजूश्री मुरकुटे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
मुरकुटे म्हणाले की, आपण स्वतः परिवर्तनवादी आहोत. कारखान्यात काळानुरुप अल्कोहोल, इथेनॉल, सह-विजनिर्मिती असे प्रकल्प उभारले म्हणून कारखाना सुस्थितीत राहिला. शेतकर्यांनीही आता काळानुरुप बदलले पाहिजे. पारंपारिक मानसिकता बदलून प्रगत व आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे. अंधश्रध्दा व कालबाह्य रुढी परंपरेतून बाहेर पडून आधुनिकता स्विकारली पाहिजे, माजी आमदार ससाणे व कांबळे या दोघांच्या अकार्यक्षमतेमुळे व नादानपणामुळे समन्ययी पाणी वाटपाचा काळा कायदा, शेती महामंडळाचे हरेगाव, टिळकनगर शेतमळ्यांचे मजूर कोट्याचे पाणी गेले. बारमाहीसह सर्व प्रकारचे ब्लॉक रद्द झाले. त्यांची शिक्षा तालुक्याला भोगावी लागत आहे. तालुक्याचे वाटोळे करुन भावी पिढीचे भवितव्य बिघडविणार्यांना गावबंदी करुन त्यांचा बंदोबस्त करण्याचे आवाहन मुरकुटे यांनी यावेळी केले.
प्रारंभी कारखान्याच्या संचालिका सुलोचनाताई पवार व त्यांचे पती माणिकराव पवार आणि कर्मचारी आण्णासाहेब यादव व त्यांची पत्नी शकुंतला यांच्याहस्ते बॉयलरचे पूजन करण्यात आले. यावेळी शेतकर्यांसाठी कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रदर्शनात जैन इरिगेशन, नेटाफिन, कास्ता, किर्लोस्कर ट्रॅक्टर, कुबोटा ट्रॅक्टर, आयडियल अॅग्री रिसर्च, स्वरुप अॅग्रो केमिकल, धानुका, एफ. एम. सी. केमिकल, बायोव्हिटा केमिकल, गार्डन किंग नर्सरी, ओमसाई नर्सरी, त्रिमुर्ती नर्सरी या कंपनींच्या प्रतिनिधींनी शेतकर्यांना मार्गदर्शन केले. या प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी कारखान्याचे जनरल मॅनेजर भास्कर खंडागळे यांचे मार्गदर्शनाखाली ऊसविकास अधिकारी विरेश गलांडे, विजय धुमाळ, सिव्हिल इंजिनिअर कृष्णकांत सोनटक्के, भाऊसाहेब दोंड, अतुल बनकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमास कारखान्याचे माजी चेअरमन रावसाहेब थोरात, सुरेश गलांडे, सोपानराव राऊत, बाबासाहेब काळे, मच्छिंद्र उंडे, जालिंदर कुर्हे, आप्पासाहेब पटारे, गणेश मुदगुले, हरिभाऊ पवार, श्रीधर कालते, भागवत पवार, आंबादास आदिक, बाबासाहेब आदिक, भाऊसाहेब पटारे, दशरथ पिसे, नाना पाटील, अॅड. सुभाष चौधरी, अॅड.पृथ्वीराज चव्हाण, अॅड. सोपान बडाख, अशोक बागुल, विजय शिंदे, अजय डाकले, सुभाष राजुळे, डॉ. रविंद्र जगधने, केतन खोरे, नानासाहेब मांढरे, हनुमंत वाकचौरे, प्रतापराव राजेभोसले, मनसुख बाफना, पंढरीनाथ पटारे, सोपान गायकवाड, अॅड. डी. आर. पटारे, सुशिला कर्पे, अर्चना गायकवाड, गोरक्षनाथ गवारे, रविंद्र बनकर, कारभारी शिंदे, गोकुळ औताडे, फकिरा वरुडे, लहानु शेजूळ, निवृत्ती थोरात, लकी सेठी, ज्ञानेश्वर मुरकुटे, गणेश भाकरे, प्रसाद खरात यांचेसह संचालक मंडळाचे सदस्य, सभासद शेतकरी, हितचिंतक, पत्रकार, कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.