सिद्धू करणार काँग्रेसबरोबर युती?
नवी दिल्ली, दि. 14 - भाजपला रामराम ठोकल्यानंतर माजी क्रिकेटर नवज्योत सिंह सिद्धू यांची काँग्रेससोबत पडद्याआड चर्चा सुरु आहे. सिद्धू काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नसले तरी काँग्रेससोबत युती करण्यासाठी ही चर्चा सुरु असल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेसने सिद्धू यांना सहा जागा देण्याचा प्रस्ताव दिला आहे. सिद्धूंकडे सध्या चार आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून युती करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. या प्रस्तावावर चर्चा झाल्यानंतर सिद्धू राहुल गांधींचीही भेट घेणार असल्याची माहिती आहे. सिद्धूंनी काँग्रेसला युतीसाठी कॅप्टन अमरिंदर सिंह यांना हटवण्याची मागणी केली होती. मात्र काँग्रेसने ही मागणी अमान्य केली. काँग्रेसने सिद्धू यांना युतीसाठी अमृतसर मतदार संघातून खासदारकी देणे, तसेच निवडक आमदारांना मंत्रीपद देण्याचा प्रस्ताव दिला आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.