भारतीय जवान चंदू चव्हाण आमच्याच ताब्यात, पाकिस्तानची कबुली
इस्लामाबाद, दि. 14 - नजरचुकीने एलओसी पार गेलेले भारतीय जवान चंदू बाबूलाल चव्हाण आमच्याच ताब्यात असल्याची कबुली पाकिस्तानने दिली आहे. भारताचे डीजीएमओ रणबीर सिहं आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यातील चर्चेत हा खुलासा झाला आहे.
भारत आता अधिकृतरित्या चंदू चव्हाण यांना भारताकडे सोपवण्याची मागणी करणार आहे. सर्जिकल स्ट्राईकच्या दुसर्याच दिवशी उरी सेक्टरमध्ये राष्ट्रीय रायफल्सचे जवान चंदू चव्हाण नजरचुकीने एलओसी पार करुन पाकिस्तानात गेले होते. भारतासाठी ही बाब दिलासादायक आहे. कारण पाकिस्तानी लष्कराच्या माहितीनंतर चंदू चव्हाण यांना पुन्हा भारतात आणण्याच्या प्रयत्नांना गती मिळण्याची शक्यता वाढली आहे.