नाशिकमधील आंदोलनात एसटीचे कोट्यवधीचे नुकसान
नाशिक, दि. 14 - तळेगावातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात उफाळलेल्या संतापात एसटीचे सर्वात मोठे नुकसान झाले आहे. 2 ते 3 दिवस चाललेल्या या आंदोलनात तब्बल 19 एसटी बस जाळल्या गेल्या. तर एसटी सेवा बंद राहिल्यामुळे एसटी महामंडळाला 3 कोटींपेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे.
सध्या नाशिकमधली परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. शाळा आणि बस सेवा कालपासून सुरळीत सुरु आहे. मात्र, बंद असलेली इंटरनेट सेवा अजून सुरु करण्यात आलेली नाही. उद्यापर्यंत इंटरनेट सेवा सुरु होणार असल्याची माहिती समजते आहे.