Breaking News

तुकाराम मुंढेंचा डॉ. डी. वाय पाटील संकुलाला दणका

नवी मुंबई, दि. 29 - नवी मुंबईतील नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संकुलात 9 मजली इमारतीचे बांधकाम सुरु आहे. हे बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगत याची परवानगी रद्द करून बांधकाम जमिनदोस्त करण्याचे आदेश नवी मुंबईचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेनी दिले आहेत. आयुक्त तुकाराम मुंढेवर अविश्‍वास ठराव आणल्यानंतरही त्यांची कारवाई तेवढ्याच जोमाने सुरु आहे. अविश्‍वास ठरावानंतर पहिलाच दणका मुंढे यांनी शिक्षण सम्राटांना दिला आहे.
डी. वाय. पाटील समूहाने पार्किंगच्या जागेवर व्यावसायिक इमारत उभारली आणि प्रत्यक्षातली पार्किंगची इमारत उद्यानावर उभारण येत आहे. 30 दिवसात ही स्वताःहून जमिनदोस्त न केल्यास महापालिका जमिनदोस्त करणार आहे. शिक्षण सम्राटांना दिलेल्या दणक्यानंतर सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर महापौर, नगरसेवक, लोकप्रतिनिधींचा अवमान करणे, महासभेत धोरणात्मक प्रस्ताव न आणता परस्पर निर्णय घेणे, स्थायी समितीच्या निर्णयावर गदा आणणे, आदी आरोप ठेवत नगरसेवकांनी अविश्‍वास ठराव आणला होता.