Breaking News

औरंगाबादेत ग्राहकांची दुकानदाराला बेदम मारहाण

औरंगाबाद, दि. 29 - औरंगाबादमध्ये दुकानदार आणि ग्राहकांमध्ये चांगलाच वाद झाला. दोन तरुणांनी धुडगूस घालत दुकानदाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला.
औरंगाबादमधील सिडको एन- 4 भागामध्ये रिद्धी डेली निड्स नावाचे किराणा दुकान आहे. दुपारी अचानक एका ग्राहक आणि दुकानदारामध्ये वाद झाला. त्यानतंर दोन तरुणांनी येऊन दुकानदाराला बेदम मारहाण केली.
याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ग्राहकाची दुकानदाराशी वादावादी चालू होती. मात्र ग्राहकाचे दोन्ही मुले दुकानात आले आणि त्यांनी थेट मारहाण सुरु केली. यामध्ये महिला दुकानदाराला देखील धक्काबुक्की करण्यात आली.