आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीत भारताची पाकिस्तानवर मात
क्वालालम्पूर, दि. 24 - आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर मात केली आहे. भारताने पाकवर 3-2 असा शानदार विजय मिळवला. मलेशियाच्या कुआन्तानमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत भारताचा हा दुसरा विजय ठरला आहे. त्यामुळे गुणतालिकेत भारताला वरचे स्थान गाठण्यात यश आले आहे.
या सामन्यात प्रदीप मोरने 22 व्या मिनिटाला गोल करुन भारताचे खाते उघडले होते. पण मोहम्मद रिझवानने 31 व्या आणि मोहम्मद इरफानने 39 व्या मिनिटाला गोल डागून पाकिस्तानला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर रुपिंदर पाल सिंग आणि रमणदीप सिंगने लागोपाठ गोल झळकावून भारताला विजय मिळवून दिला. रुपिंदरने 43 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल डागला तर रमणदीपने 44 व्या मिनिटाला निर्णायक गोल झळकावला.