Breaking News

तेंडुलकर, गांगुली, द्रविड, अझर आणि आता धोनी...!

मोहाली, दि. 24 - भारताचा वन डे कर्णधार महेंद्रसिंग धोनीने वन डे क्रिकेटमध्ये नऊ हजार धावांचा पल्ला ओलांडला आहे. मोहाली वन डेत मिचेल सँटनरने टाकलेल्या सतराव्या षटकादरम्यान धोनीने वन डे क्रिकेटमधली आपली 9 हजारावी धाव काढली.
वन डेत नऊ हजार धावांचा पल्ला ओलांडणारा धोनी पाचवा भारतीय ठरला आहे. याआधी भारताकडून सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि मोहम्मद अझरुद्दीननेच वन डेत 9 हजार धावांचा टप्पा ओलांडला होता. ही कामगिरी बजावणारा धोनी हा श्रीलंकेच्या कुमार संगकारा आणि ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅडम गिलख्रिस्ट यांच्यानंतरचा तिसराच यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे.