टीम इंडियाचा दणदणीत विजय, न्यूझीलंडवर सात विकेट्सनी मात
मोहाली, दि. 24 - विराट कोहलीच्या खणखणीत शतकाच्या जोरावर टीम इंडियाने मोहालीच्या मैदानात न्यूझीलंडला सात विकेट्स राखून धूळ चारली. या विजयाबरोबरच भारताने पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी पुन्हा आघाडीही घेतली आहे.
विराटने या सामन्यात नाबाद 154 धावांची खेळी तर केलीच, शिवाय महेंद्रसिंग धोनीच्या साथीने तिसर्या विकेटसाठी 151 धावांची भक्कम भागीदारीही रचली. धोनीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन 91 चेंडूंत 80 धावा फटकावून विराटला चांगली साथ दिली. त्यामुळेच भारताला 286 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करता आला.
मोहालीच्या तिसर्या वन डेत न्यूझीलंडने भारतासमोर विजयासाठी 286 धावांचे आव्हान दिले होते. न्यूझीलंडने 49.4 षटकांत सर्व बाद 285 धावांची मजल मारली होती. या सामन्यात न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथमने 61 धावांची खेळी केली. लॅथमने रॉस टेलरच्या साथीने तिसर्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारीही रचली. पण रॉस टेलर 44 धावांवर बाद झाला आणि न्यूझीलंडचा डाव गडगडला.
न्यूझीलंडची तीन बाद 153 धावांवरुन आठ बाद 199 अशी केविलवाणी अवस्था झाली होती. पण त्यानंतर जेम्स नीशाम आणि मॅट हेन्रीने नवव्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी रचून न्यूझीलंडच्या डावाला आकार दिला. जेम्स नीशामने वन डेतले आपले पहिलं अर्धशतक झळकावले नीशामने 47 चेंडूंत 57 धावांची खेळी केली. भारताकडून उमेश यादव आणि केदार जाधवने प्रत्येकी तीन विकेट्स काढल्या. तर जसप्रीत बुमरा आणि अमित मिश्राला प्रत्येकी दोन विकेट्स मिळाल्या.