इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी यष्टीरक्षक साहाला कोच कुंबळेच्या खास टीप्स
मुंबई, दि. 14 - भारताचा यष्टीरक्षक रिद्धिमान साहाने रणजी सामन्यांतून विश्रांती घेतली आहे. साहा रणजी करंडक स्पर्धेत बंगालचं प्रतिनिधित्व करतो. पण टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेने त्याला दोन आठवडे विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
साहाने नुकतेच न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत तिन्ही सामने मिळून 452 षटकें यष्टीरक्षण केले होते. तसेच ईडन गार्डन्सवर दोन अर्धशतके झळकावून भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि सामनावीराचा किताबही पटकावला होता. महेंद्रसिंग धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर साहाने एक यष्टीरक्षक म्हणून आपल्यावरची जबाबदारी चोख बजावली आहे.
आता 9 नोव्हेंबरपासून सुरू होणार्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी साहा ताजातवाना राहणे गरजेचे आहे. त्यामुळेच कुंबळेने त्याला काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे साहाने बंगालच्या उत्तर प्रदेश आणि पंजाबविरुद्धच्या लढतींतून माघार घेतली आहे. 27 ते 30 ऑक्टोबरदरम्यान रेल्वेविरुद्धच्या लढतीत साहा पुन्हा मैदानावर उतरेल.