Breaking News

सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज : अमिताभ

मुंबई, दि. 12 - देशवासियांनी आज आपल्या सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज असल्याचे मत महानायक अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केले आहे. अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना आज अमिताभ यांच्या ‘जलसा’ या बंगल्यावर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.
बॉर्डरवर सुरु असलेल्या घटनांमुळे देशातील जनता अतिशय संतप्त आहे. जवान आणि सैन्यदल प्राणांची बाजी लावत असल्याने मी आणि तुम्ही सुरक्षित आहोत. त्यांच्याप्रती एकता दाखवण्याची हीच वेळ आहे, असे बच्चन यावेळी म्हणाले.