Breaking News

भुजबळांना जे. जे. रुग्णालयातून हलवणार

मुंबई, दि. 12 - राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांना जे.जे. रुग्णालयातून एखाद्या अद्ययावत हॉस्पिटलमध्ये हलवले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. रुग्णालयाकडून तशा प्रकारचे पत्र जेल प्रशासनाला पाठवण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून भुजबळांच्या तब्येतीमध्ये चढउतार होत आहे. त्यासाठी काही विशेष तपासण्या करण्याची गरज आहे. त्या तपासण्यांची सोय जे.जे. रुग्णालयात उपलब्ध नाही. त्यामुळेच अशा तपासण्यांची सुविधा असलेल्या रुग्णालयात त्यांना दाखल केले जाणार असल्याची माहिती जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहाने यांनी दिली आहे. त्यासाठी लहाने यांनी जेल प्रशासनाला पत्रही लिहिलें आहे. पण असे कोणतेही पत्र मिळों नसल्याचा दावा जेल प्रशासनाने केला आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी छगन भुजबळ सध्या तुरुंगात असून त्यांच्यावर जेजेमध्ये उपचार सुरु आहेत.