संजय गांधीनगरमध्ये आगीत वीस झोपड्या खाक
काळेवाडी, दि. 10 - काळेवाडी पुलालगतच्या संजय गांधीनगरमध्ये दि. 9 सकाळी नऊच्या दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत चार गॅस सिलिंडरचे स्फोट झाले. यात वीस झोपड्या जळाल्या असून, सात झोपड्या पूर्णपणे खाक झाल्या आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र झोपड्यांचे मोठे नुकसान झाले असून अग्निशामक दलाचे जवान व नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत.
संजय गांधी झोपडपट्टीतील एका पत्र्याच्या घरात शॉर्ट सर्किट होऊन वीजमीटरने पेट घेतला. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. त्यात घरगुती गॅस सिलिंडरचे स्फोट झाले, त्यामुळे एकमेकांना चिकटून असलेल्या झोपड्यांत आग पसरत गेली, धुराचे व आगीचे लोट बाहेर पडू लागले. प्रसंगावधान राखून रहिवाशांनी बाहेर पडण्यात सुरवात केली. दरम्यान, महापालिका अग्निशामक दलाचे सात बंब घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. आग विझवत असतानाही दोन गॅस सिलिंडरचे स्फोट झाले. त्यात राजेश बंडा, महेश चौधरी व सुनील कुमार हे जखमी झोले. तोपर्यंत पुणे महापालिका, फोर्स मोटर्स, सेंच्युरी एन्का कंपनी, एमआयडीसी कंपन्यांचे बंबही घटना स्थळी दाखल झाले.