Breaking News

खोजानवाडीत विवाहितेवर बलात्कार


प जत, दि. 25 - ताडपत्री घेऊन जाण्याच्या बहाण्याने घरात येऊन एका विवाहित महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरुन शिवानंद बसाप्पा संती (वय 30, रा. खोजानवाडी, ता. जत) यास जत पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना संत मळा (खोजानवाडी) येथे घडली. याप्रकरणी पीडित महिलेने शिवानंद संती याच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. खोजानवाडी गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावरील संती मळा येथे पीडित महिलेचे घर असून, तेथून किलोमीटर अंतरावर संशयिताचे घर आहे. या परिसरात लोकवस्ती विरळ आहे. पीडित महिलेची सासू परगावी गेली आहे, तर पती व सासरा शेतात काम करण्यासाठी गेले होते. ही संधी साधून शिवानंद संती हा ताडपत्री घेऊन जाण्याच्या बहाण्याने या महिलेच्या घरात आला व त्याने महिलेवर बलात्कार केला. ही घटना घडल्यानंतर पीडित महिलेने पतीला दूरध्वनीवरुन घडलेली घटना सांगून, जत पोलिसांत येऊन तक्रार दाखल केली. दरम्यान, संशयित आरोपी शिवानंद संती याचे पाच - सहा महिन्यांपूर्वी बहिणीच्या मुलीसोबत लग्न झाले आहे. घरगुती वादातून या पती-पत्नीत मतभेद झाल्यामुळे सध्या त्याची पत्नी माहेरीच आहे. या घटनेमुळे खोजानवाडी परिसरात खळबळ माजली आहे. ही पीडित महिला तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसात दाखल झाली. यावेळी तिची वैद्यकीय तपासणी करुन आणि संशयितास ताब्यात घेऊन जत पोलिसांत सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक युवराज मोहिते करत आहेत.