Breaking News

मॉडेल अर्शी खान पुण्यातील सुधारगृहातून पळाली

पुणे, दि. 25 -मॉडेल अर्शी खान पुण्यातील हडपसरच्या महिला सुधारगृहातून पळून गेली आहे. अर्शीने दलालांच्या मदतीने पलायन केल्याचे म्हटले जात आहे.
काही दिवसांपूर्वी सोशल सर्विस सेलने एका हॉटेलमधून अर्शी खानला अटक केली होती. तिच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तिची रवानगी हडपसरच्या महिला सुधारगृहात करण्यात आली होती. आज मात्र एका दलालाच्या मदतीने तिने त्या सुधारगृहातून पळ काढला.
या सुधारगृहातून गेल्या काही दिवसात अशा पद्धतीने अनेक महिला पळून गेल्या आहेत.