Breaking News

’अण्णा : किसन बाबूराव हजारे’ आजपासून देशभरात प्रदर्शित

मुंबई, दि. 14 - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या कारकीर्दीवर बनवलेला सिनेमा आजपासून देशभरात प्रदर्शित झाला आहे. ‘अण्णा : किसन बाबूराव हजारे’ असे या सिनेमाचे नाव आहे. 130 मिनिटांच्या या सिनेमात किसन बाबुराव हजारे ते अण्णा हजारे हा प्रवास दाखवण्यात आला आहे.
अण्णांचा जीवनपट उलगडणार्‍या या सिनेमाचे शूटिंग राळेगणसिद्धीसह मुंबई, नवी दिल्ली, जम्मू-काश्मीर आणि राजस्थानमध्ये झाले आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अण्णांनी जवळपास 10 महत्त्वाच्या कार्यक्रमात भाग घेतला आहे. मुंबईतील काही चित्रपटगृहामध्येही अण्णा हजेरी लावणार आहेत.