Breaking News

’ट्रेलब्लेजर’च्या किंमतीतही भरघोस कपात

मुंबई, दि. 27 - शेवर्ले कार कंपनीने एन्जॉय एमपीव्ही कारच्या किंमतीत कपात केल्यानंतर आता आपल्या ट्रेलब्लेजर एसयूव्हीच्या किंमतीतही मोठी कपात केली आहे. या कारच्या किंमतीत तब्बल 3.04 लाखापर्यंत घट करण्यात आली आहे. त्यामुळे या कारची किंमत आता 23.95 लाख झाली आहे.
शेवर्लेने ही ट्रेलब्लेजर ही कार मागील वर्षी बाजारात आणली होती. तेव्हा या कारची किंमत तब्बल 26.40 लाख होती. सध्या सणासुदीचे दिवस असून ग्राहकांचे चांगल्या ऑफर्सकडे लक्ष असते. त्यामुळेच कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचे समजते आहे. ट्रेलब्लेजरची स्पर्धा फोर्डच्या एंडेव्हरशी आहे. नुकतेच एंडव्हेरने 2.82 लाख किंमतीत कपात केली होती. त्यामुळे आता ट्रेलब्लेजरच्या किंमतीत कपात करुन शेरवोलेटने ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.