Breaking News

नाशिकमधील मोबाईल इंटरनेट सेवा काही काळासाठी बंद

नाशिक, दि. 10 - चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्यानंतर नाशिकमध्ये तणावाचं वातावरण आहे. तसेंच या घटनेबाबत सोशल मीडियावर अनेक अफवा  पसरवल्या जात असल्याने नाशिकमधील मोबाईल इंटरनेट सेवा काही काळासाठी बंद करण्यात आली आहे. मोबाईलवरुन मोठ्या प्रमाणात अफवाचे पीक पसरत  असल्यामुळे नाशिक प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार, नाशिकमधील आमची इंटरनेट सेवा काही काळासाठी बंद करण्यात आली आहे. सेवा पुन्हा सुरु झाल्यावर  तुम्हाला कळवण्यात येईल, असा मेसेज मोबाईल कंपन्या ग्राहकांना पाठवत आहे.