Breaking News

500 आणि 1000 च्या नोटा पारखून घ्या, रिझर्व्ह बँकेचा सल्ला

मुंबई, दि. 27 - देशाच्या अर्थव्यवस्थेला सध्या बनावट नोटांची वाळवी लागली आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेनेही 1000 आणि 500च्या नोटा पारखून घेण्याचा सल्ला दिला आहे.
रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, काही समाजकंटक दैनंदिन व्यवहारामध्ये बनावट नोटांचा वापर करुन देशाच्या अर्थव्यवस्थेला कमकुवत करत आहेत. यासाठी 1000 आणि 500 च्या नोटांची योग्य पारख करुनच त्या स्विकाराव्यात.
नुकतेच दिल्लीमधून 10 रुपयांची बनावट नाणी बनवणार्‍या टाकसाळीवर छापा टाकून जवळपास 800 रुपयांची बनावट नाणी जप्त केली होती. त्यामुळे 10 रुपयांच्या बनावट नाण्यांची गंभीर दखल घेऊन, 10 रुपयांची नाणी घेण्यास नकार देणार्‍यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.