Breaking News

टीम साऊथी दुखापतीमुळे भारत दौर्‍यातून बाहेर

मुंबई, दि. 17 -  न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊथी याला दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागणार आहे. त्याच्याजागी न्यूझीलंड संघात मॅट हेन्रीची निवड करण्यात आली आहे.
साऊथीच्या घोट्याला सारावादरम्यान दुखापत झाली. त्यामुळे भारत दौर्‍यातून माघार घ्यावी लागली. भारताविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेस 22 सप्टेंबरपासून सुरवात होत आहे. साऊथीला या दुखापतीमुळे मायदेश परतावे लागले आहे. न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने त्याच्याजागी जलदगती गोलंदाज मॅट हेन्रीची निवड केली आहे.
साऊथी कसोटी मालिकेस मुकला असला तरी एकदिवसीय मालिकेपर्यंत तंदुरुस्त होण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडचा संघ सध्या मुंबईविरुद्ध सराव सामना खेळत आहे.