Breaking News

’रिलायन्स जिओ’ने स्पेक्ट्रम लिलावासाठी ठेवीच्या रूपात जमा केले 6 हजार 500 कोटी

नवी दिल्ली, दि. 17 -  ’रिलायन्स जिओ’ने स्पेक्ट्रम लिलावापूर्वी ठेवीच्या रूपात 6 हजार 500 कोटी रूपये जमा केले आहे. ही रक्कम एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया या तीन प्रमुख कंपन्यांनी जमा केलेल्या एकूण रकमेएवढी आहे.
1 ऑक्टोबरपासून सुरू होणा-या स्पेक्ट्रम लिलावाबाबतच जिओचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी आक्रमक धोरण स्वीकारल्याचे दिसत आहे. स्पेक्ट्रम लिलावासाठी ठेवीच्या रूपात भारती एअरटेलने 1 हजार 980 कोटी, व्होडाफोनने 2 हजार 745 कोटी तर आयडिया सेल्युलरने 2 हजार 50 कोटींची रक्कम जमा केली आहे. तर दुसरीकडे टाटा टेलिसर्व्हिसेसने 1 हजार कोटी, रिलायन्स कम्युनिकेशन्सने 313 कोटी आणि एअरसेलने 120 कोटी रूपये जमा केले असल्याचे यातील जाणकारांकडून सांगण्यात आले. यावेळी जिओ आक्रमक बोली न लावता केवळ नेटवर्क गॅप भरेल अशी अपेक्षा होती. मात्र जिओच्या ठेवीची रक्कम पाहता आम्ही थक्क झालो आहोत, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.