Breaking News

युवराजचे वनडे टीममध्ये पुनरागमन?

मुंबई, दि. 29 -न्यूझीलंडविरुद्ध दुसर्‍या कसोटीसाठी टीम इंडियात गौतम गंभीरने पुनरागमन केले आहे. आता गंभीरसोबतच युवराज सिंहसाठीही देखील एक चांगली बातमी आहे. तब्बल दोन वर्षानंतर फलंदाज गौतम गंभीरला टीम इंडियामध्ये स्थान देण्यात आले आहे. त्याबरोबर युवराज सिंह देखील वनडे संघात पुनरागमन करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बंगळुरुच्या नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) करण्यात आलेल्या फिटनेस टेस्टमध्ये दोन्ही खेळाडू उत्तीर्ण ठरले आहेत.
येत्या काही काळात टीम इंडिया भारतात अनेक मालिका खेळणार आहे. त्यामुळे बीसीसीआय संघाचा बॅकअप तयार करीत आहे. टीम इंडिया सध्या न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत असून यानंतर 5 वनडे सामन्यांचीही मालिका होणार आहे. युवराज शेवटचा सामना द. आफ्रिकाविरुद्ध 2013 साली खेळला होता. त्यामुळे वनडे संघात युवराजला संधी मिळणार का हे पाहणे महत्वाचें ठरणार आहे.