बीसीसीआयच्या निवड समितीतून खोडा आणि परांजपेंना डच्चू?
मुंबई, दि. 29 - जस्टिस लोढा समितीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अहवालानंतर बीसीसीआयच्या नव्या निवड समितीत दोन मोठ्या बदलांची चिन्हे दिसत आहेत. माजी यष्टिरक्षक एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील या निवड समितीतून गगन खोडा आणि जतीन परांजपे या दोघांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
पीटीआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे. बीसीसीआयने शुक्रवारी विशेष सर्वसाधारण सभा बोलावली असून, याच सभेत खोडा आणि परांजपे यांच्या भवितव्याचा फैसला होईल. लोढा समितीच्या शिफारशीनुसार निवड समिती सदस्याने कसोटी क्रिकेट खेळणे अनिवार्य आहे. पण खोडा आणि परांजपे या दोघांनीही आजवरच्या कारकीर्दीत कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले नाही. खोडाने दोन, तर परांजेपने चार वन डे सामन्यांमध्येच भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे. त्यामुळे त्या दोघांनाही निवड समितीतून दूर केले जाण्याची चिन्हे आहेत. बीसीसीआयच्या सीनियर निवड समितीत एमएसके प्रसाद यांच्यासह देवांग गांधी आणि शरणदीपसिंग यांचाही समावेश आहे.